3/16/08

कॉपी

प्रश्नांकडे तो निरखुन बघत होता पण त्याला कुठलीच उत्तरं आठवेना. पहिल्या विभागात चार पैकी दोन प्रश्न सोडावायचे होते. त्याला एकुण वीस गुण. आणि दुसर्‍या विभागात पाच पैकी तीन सोडवायचे होते व त्याला पंधरा गुण होते. त्याला एकही प्रश्न येत नव्हता. 'च्यायला' तो पुटपुटला. त्याने उरलेल्या प्रश्नांपैकी जे सोडविता येईल ते सोडवलं पण ७५ पैकी ३५ गुणांच्या नावानी बोंब होती त्याच काय? ईतिहास खरं त्याचा आवडता विषय होता. अहो, पण आवडता विषय असला म्हणुन काय झाल, अभ्यास नको का करायला?

९व्या इयत्तेची सहा-माही परीक्षा जवळ येत होती पण त्याच्या अभ्यासाच्या तयारीच्या नावानी शंख होता. त्याने आता जवळ जवळ अभ्यास करणे बंद केले होते. बास्केटबॉल व एन्.सी.सी. तून त्याला मुळीच फुरसत मिळत नसे आणि थोडा वेळ मिळालाच तर उनाडक्या करण्यात, मस्ती करण्यात तो गुंग असे. थोडक्यात, वेळ वाया घालवण्यात व अभ्यास न करण्याची कारणे शोधण्यात तो पटाईत झाला होता. घरी बरंच चिंतेच वातावरण होत. आई-वडिलांना काय कराव सुचत नव्हत व आजी या शंखाला शिस्त लावण्यात थकुन गेली होती. खर तर तिने स्वतःची, नातेवाईकांची व शेजार-पाजारची बरीच मुलं वाढवली होती. पण 'या सम हाच' अस काहीस तीला या आपल्या सगळ्यात धाकट्या नातवा बद्दल वाटु लागले होते. शाळेतही शिक्षकांना कळेना की हा विद्यार्थी जर का हुशार आहे तर अभ्यास का करत नाही ते. इंग्रजीच्या बाईंनी तर त्याला एकदा बाजुला घेउन विचारलं होत की घरी काही अडचणी आहेत का म्हणुन. एकेकाळी त्याचा वर्गात चांगलाच वरचा क्रमांक येत असे. आता मात्र घसरगुंडी थांबत नव्हती.

आमचे 'गुरु-महाराज' बहुधा निश्चिंत असतं पण सहा-माही परिक्षेचं थोंड टेंशन त्यांना जाणावु लागल होत. नुकताच तो शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सातार्‍याला जाउन आला होता. घरच्यांनी सहा-माही होईस्तोवर बास्केटबॉल खेळण्यास बंदी आणली होती. त्यामुळे त्याला आता बराच वेळ असे. 'पढाई फटाकसे खतम कर डालते है।' असला काहीसा विचार करुन तो अभ्यासाला तर लागला होता पण इतर गोष्टींप्रमाणे लक्ष देण्याची सवय लावावी लागते, अभ्यास करण्याचा सुध्दा सराव लागतो. पुस्तक हातात घेउन त्याच्या झोपाच बर्‍याचदा चालु असत. 'आज हा विषय संपवु, उद्या तो मग रिविजन' असले हवेत आराखडे बांधुन, परीक्षेची तारीख जवळ आली तरी त्याचा बहुतांश अभ्यास राहिलाच होता.

परीक्षा सहा-माही असल्यामुळे विद्यार्थ्यांना विशिष्ट पध्दतीने बसविल्या जात असे. एका बाकावर आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी बसत असत. कॉपी करु न देण्यासाठी विद्यार्थ्यांना या पद्धतीने बसविले जाई. पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे आणि पुढे रोल नंबर च्या हिशोबाने त्याच्या वर्गातील मैतर बसलेला असे. परिक्षा चालू असतांना वर्गात शिक्षक असायचे पण त्या व्यतिरिक्त इतर चपराशी, मुख्याध्यापिका किंवा तत्सम व्यक्तीगण वर्‍हांड्यातुन फेर्‍या मारत असत. एकुण बंदोबस्त चोख होता पण बिलंदर लोक कॉपी करायचेच. कोणाला उत्तीर्ण होण्याची धास्ती असे तर कोणाला पहिला क्रमांक न येण्याची. बरेचशे तर उगाचच काही तरी 'धाडस' दाखवायच म्हणुन कॉपी करत. कॉपी करण म्हणजे जवळ चिठ्ठ्या वगैरे ठेवण्याचा प्रकार दुर्मिळ असे. बहुतांश वेळा पुढल्याला किंवा मागल्याला विचारणे असलाच प्रकार असे. जिभकाटेच्या जवळ मात्र चिठ्ठ्या सापडल्या होत्या. त्याला शाळेतुन काढुन टाकलं होत.

सुरुवातीचे पेपर अपेक्षेपेक्षा बरेच चांगले गेलेत त्यामुळे तो आनंदात होता. सगळे प्रश्न सोडविल्या गेले होते. आता ते चूक का बरोबर असले भलते-सलते विचार करण्याच्या भानगडीत तो पडत नसे. अजुन महत्त्वाच म्हणजे समोर बसत असलेल्या सतीश ने या वेळेस चांगलाच अभ्यास केला होता. सतीश त्याचा चांगला मित्र असल्यामुळे आपल्या कथा नायकाचाही बराच फायदा झाला होता. काही अडलं-नडलं तर सतीश त्याची मदत करायचा. कधी कधी सप्लीमेंट बाकावर बाजुला ठेवायचा. एकुण आपली स्वारी खुशीत होती. आता फक्त ईतिहास व भूगोलाचे विषय राहिले होते. 'ये तो अपने बाए हात का खेल है'। असे त्याला वाटत होते.

अर्थात, आज ना उद्या कयामत येणारच होती, ती ईतिहासाच्या रुपाने आली.

त्याने सतीशला ढोसायला सुरुवात केली. "अबे, पहिल्या चार पैकी किंवा दुसर्‍या पाच पैकी किती प्रश्न येतात"?
एकदम इतका मोठा प्रश्न विचारल्यामुळे बराच आवाज झाला असावा? वर्गाच्या दुसार्‍या टोकाला बसलेल्या मुली ही मागे वळुन बघु लागल्या. बाई निवांतपणे बसुन काही तरी वाचत होत्या.
"पागल है क्या बे? मारेगा मुझे भी।" सतीश म्हणाला.
इथे मात्र तो तव्यावर पडल्यासारखा तडफडत होता. "बता ना बे जल्दी"
सतीश ने बोटांनी सांगितले की कुठले प्रश्न त्याने सोडवले आहेत ते.
त्याला हुश्श झालं. त्याने त्याच्या प्रश्न पत्रिकेवर त्या प्रश्नांवर रेघा मारल्यात व वीस पैकी तेरा व पंधरापैकी नऊ असे आकडे लिहिलेत. या आकड्यांना काय अर्थ होता ते त्यालाच माहिती.
"बोलु नका रे. आपापला पेपर सोडवा" बाई उगाचच ओरडल्यात.
"पेपर दिखा मुझे"
"अबे! दोन्-दोन पानांची उत्तर आहेत. एवढ दाखवणार आहे का तुला?"
"क्युं?"
" याने?"
"बस भाई, यही दोस्ती है तेरी"
"पागल झाला का बे?" सतीश म्हणाला.
" अरे कोण बोलतय रे मागे" बाईंनाही संवाद ऐकु गेला असावा. सतीशने अजुन काही न बोलता आपली सप्लीमेंट बाजुला काढुन ठेवली. तो त्यातील उत्तरे बघुन लिहु लागला. पण उत्तरे खरच लांब-लांब होती त्यामुळे सतीशचे आंग व कोपर यातुन त्याला नीटस दिसेना.
"बाजुला हो बे थोडा"
"अजुन बाजुला झालो तर पडीन मी बाका वरुन"
बरीच धुसर-पुसर चालू होती. बाजुला बसलेला दहावीचा पोरग शेवटी मधे पडला.
"अभी किसी ने और आवाज किया तो देख लुंगा पेपर के बाद"
"अस नको करु ना बे. तीस मार्कांच येत नाही या मला. काय करु सांग" तो म्हणाला.
"अभ्यास"
यावर काही उत्तर त्याच्याकडे नव्हते. वर्गातील बरीच मुलं मागे वळुन बघत होती. बाई निवांतच होत्या.
तो सतीशला सारखा पेन नी टोचु लागला. शेवटी सतीशला प्रकरण असह्य झाल. त्याने त्याच्या दोन सप्लीमेंट बाजुला काढल्यात व पायाखालुन त्याच्याकडे सारल्यात.
"घे. डोकं नको खाऊ."
हे अनपेक्षित होत. त्याला आता अजुनच भीती वाटायला लागली. तरी त्यानी खालती वाकुन ती सप्लीमेंट उचलली. खिडकीतुन कोणी बघतय का हे बघीतल व बाकाच्या कप्प्यात सप्लीमेंट ठेउन तो उत्तर भराभरा लिहु लागला. वर्गात परत शांतता पसरली.
बाई अजुनही निवांतच होत्या. चश्मा लाउन झोपल्या होत्या की मुलांवर त्यांचा नको तेवढा विश्वास होता कोण जाणे.
"झाल का रे लिहुन?" सतीशने विचारल.
"हो संपलच"
हवी असलेली उत्तर लिहुन तो अजुन काही मिळतय का हे बघत होता. तेवढ्यात कोणी तरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
त्याचं हृदयच धडधडायचं थांबल. त्याने हळुच मागे वळुन बघीतल. बाजुला बाई उभ्या होत्या. त्याने आवंढा गिळला. समोर बघीतल तर सतीश ताठरला होता. त्याचीही हालचाल थांबली होती.
"अरे, अशी सप्लीमेंट मांडीवर घेउन लिहिशील तर मागचे लोक बघीतील ना" बाई त्याला म्हणाल्या.
बाईंनी त्याच्या मांडीवर असलेली सप्लीमेंट हातात घेतली व त्या उत्तर वाचु लागल्या. बाईंच्या हातात सप्लीमेंट गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की सतीशने काळ्या शाईने उत्तर लिहिली आहेत व तो निळ्या शाईच्या पेनने उत्तर लिहित होता. त्याला काय करावं सुचेना. जणु त्याला सगळं ब्रह्मांड दिसु लागलं. पकडल्या गेलो तर काय थापा मारायच्या याचा तो विचार करु लागला. पण थापा काय मारणार इथे अक्षरश: रंगे हात पकडल्या जाण्याची पाळी आली होती. बाईंनी उत्तरांवरुन नजर फिरवली व सप्लीमेंट परत त्याला दिली.
"बरोबर लिहिली आहेत उत्तर. पण अभ्यास कमी केलेला दिसतोय यंदा. अजुन केला पाहिजे अभ्यास. अरे, पुढलं वर्ष १०वीच ना? आत्तापासुनच सवय लावली पाहिजे अभ्यासाची. आणि दोन निळे पेन घेउन यायचे असतात परीक्षेला, हे असं वेगवेगळ्या पेनने लिहिशील बोर्डात तर कॉपी केली म्हणतील बोर्डवाले!" बाई हळु आवाजात त्याला म्हणाल्यात.
"हो मॅडम" तो कसाबसा म्हणाला व त्याने सप्लीमेंट उचलुन बाकाच्या कप्प्यात टाकली. एव्हाना समोर सतीशची पाठ घामाने भरली होती.
"अरे, मुलं सप्लीमेंट लंपास करतात एका-मेकांच्या. तुझ्या सप्लीमेंट जपुन ठेव" बाई जाता-जाता परत म्हणाल्यात.
"हो मॅडम"
बाई गेल्याबरोब्बर त्याने सप्लीमेंट सतीशकडे सरकावली. "बता ना था ना बे मॅडम आ रही है कर केत्याचं हृदय भात्यासारखं वर-खाली करत होत.
घंटा झाली. सगळी मुले आपापले पेपर बाईंना देउन घरी जाउ लागले. तो अजुनही काहीच बोलत नव्हता.
"थ्यँक्यु यार" तो सतीशला म्हणाला.
"आज तर आपल्या दोघांची वाट लागली असती." सतीश म्हणाला. जे झालं त्याच्याकडे बघता सतीश बराच शांत होता. आपल्या हिरो चा त्याला फारसा राग आलेला दिसत नव्हता. त्यानी खरी 'दोस्ती' निभावली आज.
त्याने काहीच न बोलता नुसताच आवंढा गिळला. "अभ्यास करायला हवा यार"
"तु १०वीचा क्लास लावला आहे का बाईंकडे?" सतीशने विचारले.
त्याने नुसतीच मान डोलावली.

3/8/08

जोधा-अकबर

प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणतात की जोधा-अकबर चित्रपट ऐतिहासिक नाही. चित्रपटाची कथा केवळ एक प्रेम-कहाणी आहे. मी हे मान्य करायला तयार आहे. मला प्रश्न असा पडतो की हिंदी चित्रपटात प्रेम-कहाण्यांचा इतका दुष्काळ पडला आहे की एक क्रुर मुसलमानी सत्तेच्या नायकावर एक मन-घडन प्रेम-कथेवर आशुतोष गोवारीकरांना चित्रपट काढावसा वाटला. मला या चित्रपटावर आक्षेप बरेच आहेत पण त्याही पेक्षा मला दु:ख याच वाटत की एका मराठी माणसाने भारताला दार्-उल-हब्र (म्हणजे संपूर्ण मुसलमान) करण्याची आण वाहिलेल्या सुल्तानी अमलावर प्रेम-कहाणी लिहावी. जर का ऐतिहासिक घटनांवर प्रेम कथा दिग्दर्शित करण्याची एवढीच नितांत आवश्यकता गोवारीकर साहेबांना वाटली तर पृथ्वीराज-संयुक्ता किंवा बाजीराव-मस्तानी वर त्यांनी चित्रपट काढायला हवा होता. अजुन एक पायरी पुढे जायच असेल तर शिवाजीराजे-सईबाईंवर चित्रपट काढायला हवा होता. शिवबा-सईबाईंबद्दल फारस काहीच साहित्य उपलब्ध नाही. सईबाई शिवाजी राजांची पहिली बायको (संभाजी राजांच्या मातोश्री) व त्यांच्या एकुण कौटुंबिक जीवनाकडे लक्ष दिले तर सईबाईंच्या सहवासातच राजांना संसार-सुख थोड बहुत भोगायला मिळाल. सुंदर पण मन-घडनच जर का चित्रपट दिग्दर्शित करायचा होता तर सईबाईंवर कथा बेतायला काय हरकत होती? अर्थात, देश व धर्म रक्षणात शिवबांना प्रेमं करण्यास फारस वेळ मिळाला नाही यात गोवारीकर साहेबांची काय चूक? एक गोष्ट नक्की की वर सुचविलेल्या कथानकांवर चित्रपट काढण्यात फारसा पैसा गोवारीकर साहेबांना लाभला नसता. पैश्यासाठी लोक वाट्टेल ते करतात, इथे तर आपण केवळ एका चित्रपटाबद्दल बोलतोय. शेवटी सत्तालोलुप हिंदु राजे आपली सत्ता टिकविण्यसाठी मुसलमानी आक्रमकांशी गठ-बंधनं करु लागलेत. या गठ-बंधना अंतर्गत आपल्या घरातील बायका मुसलमानांकडे पोचविण्याच्या कार्याला ते धन्यता मानु लागले. थोडक्यात, घरातील आया-बहिणींना मुसलमानी हारेम मधे या 'राजपुतांनी' विकायला सुरुवात केली. या "वैभवशाली" परंपरेतंर्गत राजा भगवानदासाने आपल्या बहिणीला, जोधा-बाईला, अकबर बादशहाला विकलं. खरतर अश्या या दारुण परीस्थितीवर गोवारीकर साहेबांना प्रेम-कहाणी दिग्दर्शित करता आली याबद्दल तर त्यांच्या प्रतिभाशक्तिची दाद द्यायला हवी. अर्थात, अकबराच्या हारेम मधे अजुन २००-३०० विकलेल्या हिंदु बायका होत्या हा मुद्द्याचा इथे विचार करायचा नाहे. तो फाउल मानल्या जाईल.

मुसलमानी सत्तेचा आरंभ पृथ्वीराजाच्या पराभवानंतर म्हणजे ११व्या शतकात झाला असला तरी अरबी तसंच पर्शियन मुसलमानांचा रक्तरंजित हैदोस सध्याच्या अफगाणी सीमेपाशी ८व्या शतकापासुन चालू होता. मुहम्मद-बिन-कासिम याने सन ७१२ मधे कराची लुटल्याची नोंद आहे. आरंभी सोन आणि बायका हेच केवळ या आक्रमकांच लक्ष असे. त्या काळात लुटीतील आठ टक्के हिस्सा मुसलमानी साम्राज्याच्या खलिफाला द्यायची प्रथा असे. (पुढे हि प्रथा बंद पडली) त्यामुळे लुटलेल्या मंदिरांमधील सोन्याचा आठ टक्के हिस्सा तर खलिफाला जाईच पण पळवुन नेलेल्या बायकांच्या संख्येमधी आठ टक्के बायका सुद्धा अरब देशात खलिफाच्या दासी म्हणुन पाठविल्या जात असे. उरलेल्या बायका सैनिकांमधे वाटल्या जात असत. आता बायकांच पुढे काय व्हायच हे सांगायची गरज नाही. याच संदर्भात राणी पद्मिनीची कथा तर सर्वज्ञातच आहेपण केवळ हिंदू असल्यामुळे त्यांच्यावर हि दारुण परिस्थिती येत असे हे इथे लक्षात घेतल पाहिजे. बायका पळवुन नेण्याची हि पध्दत अगदी पाणीपतच्या युध्दातही कायम होती. अहमदशहा अब्दाली कित्त्येक मराठी कुळीन स्त्रीया अफगाणीस्थानात घेउन गेला. काही वर्षापूर्वी मी काबुल मधे १९७० च्या दशकात भारतीय परदेश विभागात काम केलेल्या एका सरकारी अधिकार्‍याचे पुस्तक वाचले. त्यात त्याला कोणी अफगाणी पुरुषाने त्याच्या अफगाणी कुटुंबात जतन करुन ठेवलेले काही दागिने आणुन दाखविले. त्या दागिन्यां मधे नथ, मंगळसुत्र व कुंकवाची पेटी यासारख्या गोष्टी होत्या.

तरुण मुलांना नोकर बनविण्यासाठी व तरुण पोरींना केवळ यौनसंबधीत दासी बनविण्याचा फार मोठा व्यापार मुसलमानी अंमलात चालु असे। बहुतांश व्यापार अरब देशांशी चालत असे. भारतीय उपखंडातून अरब देशापर्यंतच्या प्रवासा महत्वाचा टप्पा म्हणजे हिंदु-कुश पर्वत होय. ही पर्वतमाला पार करण्याचा प्रवास इतका यातनामय असे की बरीच तरुण मुलं-मुलींनी येथे शेवटचा श्वास घेतं. या मृत हिंदुंची संख्या एवढी होती की 'हिंदुची कत्ल जीथे होते' तो हिंदु-कुश असे नाव या पर्वतमालेला पडले. (या पर्वत-मालेचे मूळ संस्कृत नाव काय होते हे नेमंक मला आठवत नाहीया. पण महाभारतात या पर्वत मालेचा उल्लेख आहे.)

थोडक्यात हिंदु बायका या केवळ दासी म्हणुन उपयोगात आणण्याची पध्दती मुसलमानी अंमलात रुढ होती। दुसरी पध्दत म्हणजे की मुसलमानी सत्तेपुढे पराजय झाला तर मांडलिकत्व पत्करण्या अंतर्गत आपल्या घरातील बायका बरेचशे हिंदु राजे मुसलमानी सुल्तानाच्या हारेम मधे दाखल करत. जोधाबाई याच प्रथे अंतर्गत अकबराची 'बायको' मानल्या जात होती. अर्थात, लग्नानंतर ती मरीयम-ए-ज़माना झाली. आता अकबर कोण होता ते थोडं बघुया.

१२व्या शतकानंतर भारत म्हणजे आक्रमकांची खुली बाजारपेठ झाला होता। कोणीही यावे व दिल्लीत राज्य करावे हाच एक कायदा शिल्लक होता. याच देवाण-घेवाणीत बाबर नावाचा अत्यंत निम्न रक्ताचा व क्रुर इसम मध्य आशियातुन दिल्लीत दाखल झाला. हळु-हळु त्याने हात पाय पसरवायला सुरुवात केली. हिंदुंना मुसलमान करणे, मंदिरे तोडणे (अयोध्येचे राम-जन्मभुमीवर मशीद बांधणार हाच उत्साही सुल्तान!) इत्यादी कार्ये उरकल्यावर स्वतःला मोघली रक्तपिपासु टोळीचा वंशज बनवुन त्याने दिल्लीत मोघली अंमलाची सुरुवात केली. याच घराण्यात अकबराचा जन्म झाला. (औरंगझेब हा अकबराचा नातू) त्याने मोघली सत्तेच्या सीमा दख्खन पर्यंत ताणल्या पण राजपूतांशी भांडण्यात त्याचा बराच वेळ जात असे. यावर उपाय म्हणुन त्याने राजपूतांसमोर एक नवीन करार मांडला. जे राजपूत राजे अकबराचे मांडलिकत्व पत्कारतील व घरातील बायका अकबराच्या हारेम मधे दाखल करतील त्यांच्यावर अकबर स्वारी करणार नाही. जयपुरच्या अंबर राजघराण्यानी या कार्यात सर्वात पहिले पुढाकार घेतला. जे अकबरावर थुंकले त्यांच फारस भल झाल नाही. महाराण प्रताप बद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण चित्तोडच्या स्वारीत विजय प्राप्त झाल्यावर किल्ल्यातील ३०,००० लोकांची कत्ल अकबराने केली हे फारस कोणाला ठाउक नाहे. (गोवारीकर साहेब ऐकताय का?) अर्थात, हि कत्तल फारशी मोठी नाही. बहमनी सुल्तानांनी कर्नाटक स्वारीत एक लाख लोकांची कत्तल केली. त्या भागातील एकाही माणसाला, बाईला किंवा अर्भकाला जिंदा ठेवला नाही. पण या बहमनी सुल्तांनांचा अकबराशी काही संबंध नाही.

पण थोडक्यात या अश्या वैभवशाली मुसलमानी अंमलातील एक हलक्या रक्ताचा अकबर राजा व तलवारील पाणी नसलेल्या घराण्यात जन्म घेतल्यामुळे नाईलाजास्तव त्याची बायको झालेल्या जोधाबाईवरच प्रेमकहाणी चित्रपट दिग्दर्शित करण्याचे आपल्या गोवारीकर साहेबांना कसं सुचल? कोणा मुसलमानाला हि सुल्तान आपले वाटत असतील म्हणुन त्याने चित्रपट दिग्दर्शित केला हे मी मानु शकतो.(मुघल-ए-आज़म) पण ज्या मातीने या मुसलमानी सत्तेला यशस्वीरीत्या आव्हान देण्यार्‍या मर्द-मराठ्यांच्या पिढ्यांन्-पिढ्या जन्मी घातल्यात्याच मातीत हे गोवारीकर कसे जन्मले? पण येथे मुद्दा गोवारीकरांच्याही बराच पुढे जातो. पैशांचा जो मुद्दा मी लेखाच्या आरंभी मांडला तो इथे फार महत्त्वाचा ठरतो. गोवारीकरांनी नसतं दिग्दर्शन केलं तर दुसर्‍या कोणी केलं असत. पण दिग्दर्शन कोणीही केल तरीही अकबराचा इतिहास तर बदलत नाही. हा असला घृणास्पद, रक्तानी बटबटलेला इतिहास बाजुला ठेउन कोणी त्याच काळावर आधारित प्रेमकहणी लिहु शकतो किंवा त्यावर आधारीत चित्रपट काढण्यासाठी पैसा देउ शकतो (लेखक व निर्माते) येथे भारतीय समाजाचा पराभव आहे.

"चित्रपट केवळ कलेचे माध्यम आहे पण शिवाजीराजे आमच्या मनात कायम आहे असल्या शंढ बाता करण्यात काही हशील नाही." कारण गेल्या शंभर वर्षात शिवाजीराजांवर एकही हिंदी चित्रपट प्रकाशित झालेला नाही. महाराणा प्रतापांवरही नाही किंवा गुरु गोबिंदसिंहजी वरही नाही. जो होउन गेला तो इतिहास पण तो विसरुन, आपल्याच पूर्वजांवर झालेल्या अनन्वीत अत्याचारांकडे कानाडोळा करुन मुसलमानी आक्रमकांवर चित्रपट काढण्याची किंवा तो बघण्याची हिंमत करणार्‍या भारतीय समाजाची लाचारी वाखण्याजोगीच आहे. अनेक गोवारीकर झालेत आणि पुढे अनेक होतीलही पण या भारतीय समाजाच्या मूढत्वावर काही उपाय आहे का, हे सांगण अशक्य आहे.

3/1/08

श्री गणेश वंदना - भाग ३

पदरचना सुंदर। तेच रंगविलेले वस्त्र।
त्या पटातील अलंकार। ते च वाण तेजस्वी॥

कौतुके पाहता काव्यनाटका। त्याच रुणझुणती क्षुद्रघंटिका।
त्यांचा अर्थ-ध्वनी ऐका। मंजुळवाणा॥

पाहू जाता मार्मिकपणे। जी त्यांतील श्लेषस्थाने।
तीच घागर्‍यातील रत्ने। करगोट्याच्या॥

व्यासादींच्या मती। मेखलासम शोभती।
त्यांची सरळता झळाळे अती। पदरासमान॥

ज्यांस षड्दर्शने म्हणती। तेच सहा भुज असती।
त्यातील भिन्न अभिप्राय असती। शस्त्रासमान॥

तर्क तोचि परशू घोर। न्यायशास्त्र हा अंकुश तीव्र।
वेदात्न तो सुरस मधुर। मोदक शोभे॥

गणपतीच्या रेशमी वस्त्रांना ग्रंथांमधील सुंदर पदरचनांची उपमा देतांना ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की वस्त्रांना शोभतील असेच अलंकार गणपतीचे आहेत. येथे वाण शब्दाचा अर्थ लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात सुवासिनी स्त्रीयांची वाण भरण्याची पध्दत आहे. वाण म्हणुन बहुधा मुठभर गहु, शेंगा इत्यादी गोष्टींनी ओटी भरल्या जाते. येथे गणपतीच्या वस्त्रांना व अलंकारांना वाणाची दिलेली उपमा अप्रतिम तर आहेच ज्ञानेश्वर महाराजांची कल्पनाशक्ती प्रगल्भ असुनही सामान्य जीवनाच्या किती निकट आहे हे बघुन मन विस्मित होते. ज्ञानेश्वरीची महानता यातच दडलेली आहे. श्रुती व स्मृती या दोहोंचा अपूर्व संगम गीतेत होतो. गीतेतील श्लोक गेय तर आहेच पण प्रत्येक शब्दात तत्त्वज्ञान ठासुन भरलेल आहे. ते सहजा-सहजी सामान्य बुध्दीस झेपत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील प्रगाढ तत्त्वज्ञान केवळ मराठीत उतरविले नाही तर अत्यंत रसाळ भाषेत ज्या कल्पना व उपमा सामान्य जनास सहज रुचतिल त्यांचा वापर करुन मराठी मनं पावन केलं.

गणपतीच्या गळ्यातील रुण-झुणणार्‍या क्षुद्र-घंटांना भारतीय साहित्य व कलेला (काव्य व नाटके) उपमा देतांना महाराज पुढे म्हणतात की या घंटांचा मंजुळवाणा अर्थ-ध्वनी ऐका। येथे अर्थ-ध्वनी शब्द परत मला फार आवडला. मागे आपण अर्थ-शोभा या शब्दाबद्दल बोललो होतो त्याच पठडीत अर्थ-ध्वनी शब्दाचा उपयोग येथे केला आहे. पण भारतीय साहित्य व कला केवळ इंद्रियांनाच सुखावणार नसुन त्यातील विचार हे अर्थपूर्ण आहेत हे ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शविले आहे. महाभारत कथन करण्याचे कार्य आदि व्यासांनी तर लेखनाचे कार्य गणपतीने केले. या अपूर्व संगमातुनच महाभारत व गीतेची निर्मिती झाली. या संगमाचे वर्णन करतांना महाराज गणपती आदि व्यासांच्या मती मेखले सारखा झळाळत होता असे म्हणतात. मेखला म्हणजे तेजस्वी कंबर-पट्टा. (थायलँड मधील एका नदीचेही नाव मेखला आहे!)

गणपतीचे षड्-भुजांना महाराज षड्दर्शनांची उपमा देतात।


वैषशिखा (कानद)
न्याय (गौतम)
सांख्य (कपिल)
योग (पातंजली)
मिमांसा (जैमिनी)
वेदांत (बाद्रायण)


या सहा तत्त्वज्ञानांचा षड्दर्शनां मधे समावेश होतो। हि षड्दर्शने म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानांचा पाया आहे। प्रत्येक विषयावर लिहिण्याचे ईप्सित येथे नाही. पण यातील वेदांत तत्त्वज्ञान आपण सर्वांस अधिक परिचित आहे. वर्तमान परिस्थितीतील भारतीय समाजाचे धर्म, अर्थ, काम व मोक्ष या बद्दलचे विचार हे आद्य शंकराचार्यांनी प्रसार केलेल्या अद्वैत सिंध्दांतांच्या भक्कम पायावर उभे आहेत. पण हा वेदांत सिध्दांत मूळ बाद्रायण ऋषिंनी प्रस्थापित केला होता.


याच ओवीत पुढे महाराज म्हणतात की ही सहा तत्त्वज्ञाने गणपतीचे सहा हात आहेत व या तत्त्वज्ञानातील अभिप्रेत अर्थ हे गणपतीच्या हातातील अस्त्र आहे. तर्काला महाराज परशुची उपमा देतात. परशु म्हणजे परशुरामांचे आवडते अस्त्र. येथे तर्काला परशुची उपमा देण्यामागे काय उद्देश असावा यावर भाष्य करणे थोडे कठिण आहे. परशु एका घावात दोन तुकडे करतो त्याच प्रमाणे जो तर्क कुठल्याही विवादाचे सत्य-असत्य असे दोन तुकडे करतो असा अर्थ अपेक्षित असावा असं मला वाटत. पुढे महाराज म्हणतात की गणपतीच्या हातातील मोदक म्हणजे वेदांत सिध्दांत होय.